लवकरच ज़िल्हा परिषदेमध्ये १९००० पदभरती सुरु होणार :- संभाव्य वेळापत्रक जाहीर
प्रत्येक तरुण या ज़िल्हा परिषद जाहिरातीची वाट पाहत आहेत परंतु या ज़िल्हा परिषद जाहिरातीवर राज्यातील राजकीय अस्थिर सरकारचे सावट आले आहे. मे महिन्याचा पहिला आढवाड्यात जाहीर केलेल्या वेळापत्रका प्रमाणे जाहिरात १५ ते २२ मे दरम्यान प्रसिद्ध होणार होती परंतु अजून सुद्धा जाहिरात प्रसिद्ध झालेली नसून विध्यार्थ्यां मध्ये अजून संभ्रम निर्मण झालेला आहे. प्राप्त माहितीनुसार ज़िल्हा परिषद जाहिरात लवकरच सुरु होईल.. मे महिन्यात जाहिरात प्रसिद्ध करणार होते पण राज्यातील राजकीय अस्थिर सरकारचे सावट आले आहे.
भरतीचे संभाव्य वेळापत्रक पुढील प्रमाणे (शक्यता)
- जाहिरात प्रसिद्ध करण्याची तारीख १५ मे ते २२ मे
- ऑनलाईन अर्ज सादर करण्याची तारीख २३ मे ते १४ जून
- परीक्षेची तारीख ३ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२३
ज़िल्हा परिषद अंतर्गत गट-क मधील आरोग्य व इतर विभागातील संवर्गांच्या पदभरती जाहिरात कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून जिल्हा परिषदमध्ये सरळ सेवेनुसार प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या सर्व जाहिरातींकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा २ वर्ष इतकी शिथिलता देण्यात आली आहे.
त्यानुसार सर्व पदांची बिंदुनामावली अंतिम करण्याचे काम पूर्ण झालेले आहे. पदभरतीसाठी जाहिरात आयबीपीएस कंपनीला देण्यात आली असा करार मागील महिन्यात देखील करण्यात आलेला आहे जिल्हा परिषदेची भरती १ ते ७ मे दरम्यान जाहिरात प्रसिद्ध करून कार्यवाही सुरू होईल, असे सांगण्यात आले आहे .
सन २०१५ ते २०१६ पासून एकदाही ज़िल्हा परिषद जाहिरात जागांची भरती झालेली नाही सर्व जिल्हामधील परिषद जाहिरात मिळून १८ हजार ९३९ रिक्त झालेल्या जागांची भरती करणार असून यासाठीची जाहिरात मे महिन्याच्या दोन आठवड्यात प्रसिद्ध करण्याचा निश्चय ग्रामविकास विभागाने केला आहे.
Join Our Whatsapp Group : Click Here
Join Our Youtube Chanel : Click Here
अश्याच नौकरी भरती जाहिरातीसाठी आमच्या WhatsApp Group ला जॉईन करा.